पंढरपूर/ प्रतिनिधी: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आजाराची लक्षणे असणाऱ्या व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्याची मोहिम राबविणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामीण भागातील भोसे, खेडभोसे व रोपळे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने त्यांच्या संपर्कातील नागरिकांची व आजाराची लक्षणे असणाऱ्या नागरिकांची ॲटीजेन टेस्ट घेण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये आज १७५ रॅपिड ॲटिजेन टेस्ट घेण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
जे नागरिक आजाराची लक्षणे अथवा कोरोना बाधितांच्या सपर्कात असून देखील तपासणीसाठी पुढे येत नाहीत अशा नागरिकांसाठी शोध मोहिम राबवून जवळच्या प्रांथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली जाणार आहे. हि मोहिम तालुक्याच्या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांत राबविण्यात येणार आहे.ज्यांना सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास अशी लक्षणे आढल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही गटविकास अधिकारी घोडके यांनी केले आहे.
0 Comments