खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील सात जण कोरोना बाधित


खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा या दोघांच्याही कुटुंबातील सात जणांना करोनाची बाधा झाली आहे. नवनीत कौर राणा यांच्या सासूबाई, सासरे, नणंद, पुतणे, भाची या सगळ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तसंच आमदार रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही करोना झाला आहे.

राणा कुटुंबातल्या ज्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे त्यांना उपचारांसाठी नागपूर येथे पाठवण्यात आलं आहे. तर आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्यासह इतर सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे..नवनीत राणांच्या कुटुंबाबाबत ही माहिती समजताच अमरावती येथील शंकरनगर मध्ये असलेल्या त्यांच्या घरी गर्दी होते आहे. 

Post a Comment

0 Comments