सोशल डिस्टंसिंग पाळत आजरा येथे शासकीय ध्वजारोहण ; कोविड योद्ध्यांचा केला गौरव


       
राकेश करमळकर/आजरा ;

भारताचा ७४ वा स्वातंत्र्य दिन आजरा येथे तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार विकास अहिर यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता   पार पडला. यावेळी सोशल डिस्टंसिंग ची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. कविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ७४  स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
        
कोविड महामारी च्या काळात ज्या कोविड योद्ध्यांनी अहोरात्र परिश्रम केले अशा योद्ध्याना यावेळी सन्मानपत्र व पुष्प देऊन गौरविण्यात आले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक फर्नांडिस, डॉ. रश्मी राऊत, डॉ. धनंजय देशमुख, आरोग्य अधिकारी श्री.यशवंत सोनवणे, तहसीलदार कार्यालयातील लिपिक श्री गौस मकानदार, पोलीस विभागातील कॉन्स्टेबल विशाल कांबळे, कॉन्स्टेबल संतोष फराकटे, कॉन्स्टेबल रणजीत जाधव, चेक नाक्यावर चहा पाण्याची व्यवस्था करणारे गवसे येथील संतोष दिवेकर, बहिरेवाडी येथील तुळशीराम कानडे, आजरा कोविड सेंटर येथे जेवणाची व्यवस्था करणारे श्री.परशराम  कोरवी या कोविड योद्ध्यांचा सन्मान तहसीलदार विकास अहिर व सपोनि बालाजी भांगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तहसीलदार कार्यालयातील सर्व प्रशासकीय वर्ग व आजरा पोलीस ठाणे येथील कर्मचारी व आजऱ्यातील सामाजिक व सांस्कृतिक स्तरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments