राकेश करमळकर/आजरा:
आजरा शहरांमध्ये पुन्हा नव्याने सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तालुक्यामध्ये देवडे व हात्तीवडे येथील प्रत्येकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे आज नव्याने तालुक्यात आठ जण कोरोना बाधित झाले आहेत . वाढते रुग्ण पाहता समूह संसर्गाच्या काळात शहरवासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
शहरामध्ये समूह संसर्ग वाढू नये म्हणून आजरा नगरपंचायत येथे नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, या बैठकीमध्ये लॉकडाऊन रविवार पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण आजरा शहर रविवार पर्यंत लॉक डाऊन राहणार आहे. या बैठकीस मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, अशोक अण्णा चराटी, विलास नाईक, आनंदा कुंभार, अस्मिता जाधव, बाळ केसरकर यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments