कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर ९८४ जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील
आज दिनांक १९ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ६३१ प्राप्त अहवालापैकी ४८८ निगेटिव्ह तर ४९ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (१७ जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह आला आहे.) ५ अहवाल नकारण्यात आले तर ७२ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण २१४१ पॉझीटिव्हपैकी ९८४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण ११०७ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त ४९ पॉझीटिव्ह अहवालापैकी चंदगड-१, गडहिंग्लज -२, हातकणंगले- १, कागल-१, करवीर-९, पन्हाळा-५, शिरोळ-२, नगरपालिका क्षेत्र- १५, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- १२, व इतर राज्य व जिल्हा-१ असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- ९६, भुदरगड- ८३, चंदगड- २४८, गडहिंग्लज- १५२, गगनबावडा- ७, हातकणंगले- ७१, कागल- ६७, करवीर- २२८, पन्हाळा- ८८, राधानगरी- ८४, शाहूवाडी- २२१, शिरोळ- ६०, नगरपरिषद क्षेत्र- ४४२, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२५२असे एकूण २१०० आणि जिल्हा व राज्यातील ४१ असे मिळून एकूण २१४१ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण २१४१ पॉझीटिव्ह रूग्णांपैकी ९८४ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५० जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ११०७ इतकी आहे.
0 Comments